Rohit Pawar : एफआयआर दाखल होत नसल्याने रोहित पवार आक्रमक; राज ठाकरेंची घेतली भेट
Rohit Pawar दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची चौकशी होण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि बारामती पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रोहित पवारांची एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर रोहित पवार यांनी गुरुवारी (27 फेब्रुवारी) पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली होती. मात्र आता रोहित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याची पाहायला मिळत आहे











