Karuna Munde : मंत्रिपदाची स्वप्ने पण आमदारकीच जाणार, धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर: Karuna Munde माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्रिपदाची स्वप्ने पाहत आहेत. मात्र, औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांची आमदारकी १०० टक्के रद्द होणार,” असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार असून, न्यायालयाने पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्याची माहितीही करुणा मुंडे यांनी दिली.Karuna Munde



खंडपीठात सुनावणी पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, आमची अर्धी केस पूर्ण झाली असून, पुढील तारखेपासून मुख्य सुनावणीला सुरुवात होईल. उच्च न्यायालयाने आम्हाला सर्व पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, परळीत आमचा अर्ज फेटाळला गेल्यानंतर आम्ही अंबाजोगाई न्यायालयात अपील केले आहे. तेथेही न्यायालयाने धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली आहे. दोन्ही ठिकाणी आम्हाला यश मिळेल, याची मला खात्री आहे.”

परळीच्या तहसीलदारांना २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याच्या घटनेचा संदर्भ देत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. “२० हजार रुपयांसाठी एक तहसीलदार तुरुंगात जाऊ शकतो, तर माझा निवडणूक अर्ज अवैध ठरवण्यासाठी धनंजय मुंडेंनी त्यांना किती मोठी रक्कम दिली असेल, हे आता न्यायालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येईल,” असे त्या म्हणाल्या.

“Dreams of Ministerial Post, But May Lose MLA Seat,” Karuna Munde Targets Dhananjay Munde

महत्वाच्या बातम्या