विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : Sanjay Deshmukh शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ भीषण अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातातून खासदार संजय देशमुख थोडक्यात बचावले असून ते आता पूर्णपणे सुखरूप आहेत.Sanjay Deshmukh
खासदार देशमुख एका कार्यक्रमातून परतत असताना एका ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, अपघातानंतर त्यांनी तातडीने दिग्रस येथील एका खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याची माहिती समोर आल्याने त्यांच्या समर्थकांनी आणि कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.Sanjay Deshmukh
अपघाताची बातमी समजताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने धाव घेत जमावाला पांगवले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.
वसमतमध्ये दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे एका कार्यक्रमातून परत येत होते. देशमुख हे आपल्या इनोव्हा क्रिस्टा या एसयूव्ही प्रवास करत होते. दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ देशमुख यांची कार पोहोचली असताना भरधाव वेगात असलेल्या टिप्परने देशमुख यांच्या इनोव्हाला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, इनोव्हाच्या मागील भागाचा चक्काचूर झाला.
MP Sanjay Deshmukh Narrowly Escapes in Horrific Crash After Tipper Rams Into Innova
महत्वाच्या बातम्या
- Sunetra Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार
- Manoj Jarange : माझ्या विराेधात स्टिंग ऑपरेशनचा कट, महिलेचाही सहभाग : मनाेज जरांगे यांचा दावा
- व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास बारामती पाेलीसांचा नकार, दबाव असल्याचा राेहित पवार यांचा आराेप
- बारामती पोलीस ठाण्यात ‘ब्लॅक बॉक्स’, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण