विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे बसून मराठी शाळा बंद असल्याच्या चर्चा करत आहोत, असा टाेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.Devendra Fadnavis
मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याच्या संदर्भात चर्चेवर बाेलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठी शाळा चालाव्यात या पाठीमागे नुसती आपली भावना असून फायदा नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. नाहीतर कुणी मराठी आपली मातृभाषा कशी शिकेल?Devendra Fadnavis
२ हजार मराठी शाळा बंद करणार, ६५ हजार मराठी शाळा बंद पडल्या, हे आकडे इतक्या आत्मविश्वासाने येतात कुठून? हे मला समजत नाही. त्यामुळे मी आकडेवारीच घेऊन आलोय. आजही आपल्याकडे ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. या शाळांमध्ये एकूण ७० टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १६ हजार शाळा स्वयंअर्थसाहित आहेत. इंग्रजी शाळांमध्ये ६५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांना तुम्ही नेहमी कुंभमेळ्यावर का येता? कुंभमेळ्याबद्दल तुम्हाला एवढा काय राग आहे असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याव एवढा पैसा का खर्च होतोय याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कुंभमेळा हा जगातील अमूर्त वारसा आहे. जगात इतक्या मोठ्या प्रमाणात अशाप्रकारचा मेळावा होत नाही. कुंभमेळ्याती कुणी कुणाला जात विचारत नाही. कुंभमेळ्यामध्ये आपण ज्या व्यवस्था करत आहोत, त्या त्यातपुरत्या नाहीयेत. कुंभमेळ्यात केलेल्या व्यवस्थांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. अयोध्या मंदिर आणि काशिनाथ विश्वनाथ कॉरिडोरमुळे १०-१० कोटी लोक तिथे जात आहेत. त्याने राज्याची अर्थव्यवस्था बदलून गेली. कुंभमेळ्यातील ज्या गोष्टी लगेच संपणार आहेत, अशांवर फार कमी करत आहोत. शाश्वत विकासाच्या व्यवस्थांवर लक्ष केंद्रीत केलेले आहे.Devendra Fadnavis
एका कुंभमेळाने उत्तर प्रदेशचे ब्रँडिंग संपूर्ण जगात झाले. आपल्यालाही नाशिक कुंभमेळ्यातून जगात महाराष्ट्राचे ब्रँडिंग करायचे आहे. त्यादृष्टीकोनातून कुंभमेळा नीट झाला पाहिजे, व्यवस्था नीट राहिल्या पाहिजे, सोयी नीट करता आल्या पाहिजे, गर्दी व्यवस्थापन योग्य झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.Devendra Fadnavis
Our children are in English schools and we are sitting here discussing Marathi schools, says Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक