State Government : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा असा हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी आणि इतर पात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना होळीची भेट दिली आहे. वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज 25 फेब्रुवारी विधान परिषदेत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती निवेदनाद्वारे दिली.











