विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Ajit Pawar Crash; बारामतीजवळ 28 जानेवारी रोजी झालेल्या भीषण लिअरजेट अपघातानंतर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने व्हिएसआरच्या Ajit Pawar Crash;(M/s VSR Ventures Pvt. Ltd.)या कंपनीच्या चार विमानांवर तत्काळ उड्डाणबंदी लागू केली आहे. या अपघातात ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. Ajit Pawar Crash;
DGCA ने VSR कंपनीची VT VRA, VT VRS, VT VRV आणि VT TRI या Learjet 40/45 मालिकेतील विमानांना पुढील आदेश येईपर्यंत उड्डाणासाठी अयोग्य घोषित केले आहे. विशेष सुरक्षा लेखापरीक्षणादरम्यान एअरवर्दिनेस व्यवस्थापन, देखभाल नियोजन, उड्डाण प्रक्रियेतील त्रुटी तसेच अंतर्गत सुरक्षा देखरेखीत गंभीर उणिवा आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. Ajit Pawar Crash;
कंपनीला सविस्तर ‘रूट कॉज अॅनालिसिस’ सादर करून आवश्यक सुधारात्मक कृती आराखडा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तोपर्यंत कंपनीला विमान संचालनास परवानगी दिली जाणार नाही.
नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत सार्वजनिक करण्यात येईल. अपघातानंतर 30 दिवसांच्या आत प्राथमिक निष्कर्ष जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तांत्रिक त्रुटी आणि संभाव्य गैरव्यवहारांबाबत शंका व्यक्त करत त्यांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चौकशी पूर्ण होईपर्यंत नागरी उड्डाण मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या पत्राची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
Directorate General of Civil Aviation Grounds VSR Fleet After Ajit Pawar Crash; Preliminary Report by Feb 28
महत्वाच्या बातम्या
- विधानसभेत 11,995.33 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; महसुली तूट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न
- गाेल्डन अवरमध्ये सायबर फ्राॅडची तक्रार आल्यास पैसे रिकव्हर, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; इमारतीवरून उडी मारल्यानंतर महिलेचा मृत्यू
- contractor’s agitation तब्बल ७७ हजार कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित, कंत्राटदार आंदोलनाच्या पावित्र्यात