विशेष प्रतिनिधी
मुंबई : State Government मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा असा हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी आणि इतर पात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना होळीची भेट दिली आहे. वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज 25 फेब्रुवारी विधान परिषदेत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती निवेदनाद्वारे दिली.State Government
वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यासंदर्भात माहिती दिली. महागाई भात्यातील ही वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात येणार असून जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्च 2026 मध्ये देण्यात येईल. तर नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या या निर्णयाचा लाभ सुमारे 5.96 लाख कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच 8.12 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या संवेदनशील आणि सकारात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. तसेच शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून राज्यातील सर्व घटकासोबत राज्य शासनाच्या आर्थिक सुरक्षिततेस ही प्राधान्य देत असल्याचे वित्त राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले.
Holi Bonanza for State Government Employees; Dearness Allowance Hiked by 3%
महत्वाच्या बातम्या
- विधानसभेत 11,995.33 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; महसुली तूट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न
- गाेल्डन अवरमध्ये सायबर फ्राॅडची तक्रार आल्यास पैसे रिकव्हर, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; इमारतीवरून उडी मारल्यानंतर महिलेचा मृत्यू
- contractor’s agitation तब्बल ७७ हजार कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित, कंत्राटदार आंदोलनाच्या पावित्र्यात