Nitin Gadkari फास्टॅगचा वर्षाचा पास अवघ्या 3 हजारात, सुलभ प्रवासासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा उपक्रम

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात लवकरच वार्षिक फास्टॅग पास सुरू केला जाणार आहे. केवळ तीन हजार रुपयांत हा पास मिळणार असून त्यामळे महामार्गांवरचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आता देशात फास्टॅगवर आधारित वार्षिक पास सुरू केला जाईल. याच वर्षी 15 ऑगस्टपासून या योजनेला सुरुवात होईल. हा पास वार्षिक असेल. यासाठी चालकांना तीन हजार रुपये भरावे लागतील. टोल प्लाझासंबंधी वारंवार येणाऱ्या प्रश्नांवर यामुळे तोडगा निघेल, असेही ते म्हणाले. पास काढल्याने ही यंत्रणा जाचक न वाटता टोल भरणे सहज सोपे करेल. बिगर व्यावसायिक खासगी वाहनांना हा पास देण्यात येईल. यात गाड्या, व्हॅन, जीप यांचा सहभाग असेल. तर हा पास छोटी व्यावसायिक वाहने, ट्रक तसेच बससाठी लागू होणार नाही.



हा फास्टॅगवर आधारित वार्षिक पास राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्स्प्रेस वे साठी लागू असेल. या पासवर 1 वर्ष किंवा 200 प्रवास (जे आधी येईल) करता येतील. हा पास महामार्ग प्रवास ऍप, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासोबतच MoRTH च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.

केंद्र सरकारच्या या नवीन योजनेचा फायदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा तसेच एक्स्प्रेस वे चा उपयोग करतात त्यांना जास्त होणार आहे. सध्याच्या व्यवस्थेत लोकांना वारंवार फास्टॅग रिचार्ज करावे लागते. यात टोलपोटी हजारो रुपये खर्च होत असत. ही नवीन व्यवस्था लागू झाल्यानंतर प्रवासी वर्षभरासाठी तीन हजार रुपयांत प्रवास करू शकतील. याशिवाय, महत्त्वाचे म्हणजे यामुळे टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबलचक रांगा दिसणार नाहीत. लोकांचाही वेळ वाचेल.

Annual pass for FASTag for just Rs 3,000, Nitin Gadkari’s initiative for easy travel

महत्वाच्या बातम्या