ED’s Major Crackdown : ईडीची मोठी कारवाई; युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती यांच्यासह अनेकांची मालमत्ता जप्त

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ED’s Major Crackdown ऑनलाइन बेटिंग अॅप ‘1XBet’ शी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत क्रिकेट, चित्रपटसृष्टी आणि क्रीडा विश्वातील अनेक नामांकित व्यक्तींच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.ED’s Major Crackdown

ईडीने शुक्रवारी केलेल्या या कारवाईत एकूण 7.93 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार युवराज सिंग, माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा, तसेच अभिनेत्री उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती, नेहा शर्मा, अभिनेता सोनू सूद, माजी क्रिकेटपटू अंकुश हजारा यांच्याशी संबंधित मालमत्तांचा समावेश आहे.ED’s Major Crackdown

ईडीच्या तपासानुसार, या व्यक्तींनी ‘1XBet’ या ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती, प्रचार किंवा अन्य आर्थिक व्यवहारांमधून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर केल्याचा संशय आहे. या व्यवहारांमधून मिळालेली रक्कम मनी लॉन्डरिंगच्या कक्षेत येत असल्याचा ईडीचा दावा आहे.ED’s Major Crackdown



‘1XBet’ हे ऑनलाइन बेटिंग अॅप भारतात बेकायदेशीर असून, त्यामार्फत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. यापूर्वीही या प्रकरणात विविध बँक खाती, डिजिटल व्यवहार, स्थावर मालमत्ता आणि लक्झरी वस्तूंवर ईडीने कारवाई केली होती.

ईडीकडून सांगण्यात आले की, या प्रकरणाचा तपास अजून सुरू असून, आणखी काही प्रसिद्ध व्यक्ती, जाहिरात एजन्सी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स ईडीच्या रडारवर आहेत. पुढील काळात चौकशीची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कारवाईमुळे क्रीडा आणि मनोरंजन विश्वात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित व्यक्तींनी मात्र यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

ED’s Major Crackdown: Assets of Yuvraj Singh, Robin Uthappa, Urvashi Rautela, Mimi Chakraborty Among Many Seized

महत्वाच्या बातम्या