Shubhanshu Shukla : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला 19 जूनला घेणार अंतराळ झेप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणाऱ्या अ‍ॅक्सिअम मिशन 4 (Axiom-4) मोहिमेची नवी संभाव्य लॉन्च तारीख आता 19 जून निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती विज्ञान-तंत्रज्ञान आणि अंतराळ विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

फाल्कन ९ रॉकेटमध्ये द्रव ऑक्सिजन गळतीमुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. ही मोहीम ११ जून रोजी सुरू होणार होती. भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अ‍ॅक्सिअम मिशन 4 (एएक्स-4) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अन्न आणि पोषणविषयक विशेष प्रयोग करतील. या उपक्रमांद्वारे भारत केवळ अंतराळात पोहोचत नाही, तर तिथे मानवी जीवन कसे टिकवायचे, मानवाने कसे सेवन करायचे आणि कसे जगायचे याचे भविष्य घडवत आहे. या प्रयोगांच्या यशामुळे अंतराळातील मानवी पोषणात क्रांती येऊ शकते आणि बंद वातावरणातील जैव-पुनर्वापर प्रणाली शक्य होऊ शकते.

अ‍ॅक्सिअम-4 मोहिमेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) हे मिशन पायलट म्हणून काम पाहतील. त्यांच्या सोबत मिशन कमांडर म्हणून पेगी व्हिटसन (यूएसए, एनएएसएचे माजी अंतराळवीर), तसेच मिशन स्पेशालिस्ट म्हणून स्लावोश उज्नान्स्की-विश्न्येफ्स्की (पोलंण्ड/इएसए) आणि टिबोर कापू (हंगेरी/इएसए) सहभागी असतील.

Indian astronaut Shubhanshu Shukla to take spacewalk on June 19

महत्वाच्या बातम्या