विशेष प्रतिनिधी
नाशिक : Rahul Gandhi भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) हिंगोली येथील सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. आता त्यांनी सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिकच्या चकरा माराव्या लागणार आहेत.Rahul Gandhi
सावकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने राहुल गांधींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी सावरकरप्रेमींनी 2022 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असता, नाशिक जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन घेण्यासाठी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
राहुल गांधीं विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. राहुल गांधी यांनी सुनावणीला हजर राहून जामीन घेणे अपेक्षित होते. परंतु, आज राहुल गांधी यांनी उपस्थित राहू शकत नाहीत, असे कारण त्यांचे वकील जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी दिले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र जामीन घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे अशी मागणी अर्जदारांनी केली. ती मान्य करण्यात आली.
कायमस्वरुपी सवलत मिळवण्याची ही वेळ नाही. प्रथम जामीन होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन होऊ शकत नाही, प्रत्यक्ष हजर राहून जामीन घ्यावा लागेल, असे मुद्दे अॅड. पिंगळे यांनी मांडले. न्यायालयाने ही बाब मान्य केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ मे रोजी होणार असल्याचे वकिलांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयासमोर सर्वजण समान असल्याचे मत ही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले आहे.
आता यापुढील सुनावणीवेळी राहुल गांधींनी ऑनलाइन हजर न राहता प्रत्यक्ष कोर्टात येऊन आपली बाजू मांडावी असे आदेश त्यांना कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील मनोज पिंगळे यांनी याबाबत बोलताना दिली आहे.
राहुल गांधी यांच्या विधानाने भावना दुखावल्याने सावरकरप्रेमी आणि निर्भया फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Insulting statement on freedom fighter Savarkar will face Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis ड्रग्सशी संबंध आढळल्यास थेट बडतर्फ, मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना इशारा
- Madhuri Misal एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
- Devendra Fadnavis ड्रग्स संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलीसी पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी सापडला तरी थेट निलंबन, मुख्यमंत्र्यांचा इशारा
- Walmik Karad संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मास्टरमाईंड, सीआयडीचा आरोपपत्रात दावा