Jyoti Malhotra तुरुंगात असलेली ज्योती मल्होत्रा वडिलांसमोर घडाघडा बोलली !

विशेष प्रतिनिधी !

जम्मू : ऑपरेशन सिंदूरच्या धाडसी कारवाईनंतर प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा Jyoti Malhotra हिला हेरगिरी करून पाकिस्तानला मदत पुरविण्याच्या आरोपाखील अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर भारताच्या विविध तपास यंत्रणांनी तिची कसून चौकशी केली. या चौकशीतून ज्योती पाकिस्तानला भारताविषयी संवेदनशील माहिती पुरवत असल्याचं समोर आलं. त्यानंतर या प्रकरणादरम्यान जेव्हा ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी म्हणजेच हरिश मल्होत्रा यांन तिची तुरुंगात जाऊन तिची भेट घेतली, तेव्हा ज्योतीने वडिलांसमोर आपली बाजू मांडली.

आपल्या वडिलांसमोर बाजू मांडत असताना ज्योतीने सांगितलं, कि मी काहीही केलं नाही. मी निर्दोष आहे. या प्रकरणात माझी काहीही चूक नाही. मला यात विनाकारणच अडकवण्यात आलंय. असं म्हणत तिने या प्रकरणातून आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला.

पोलिस तपासात समोर आलेल्या बाबी

आता ज्योती मल्होत्राने Jyoti Malhotra जरी आपल्या वडिलांसमोर या हेरगिरीच्या प्रकरणाची जबाबदारी नाकारलेली असली, तरी तेव्हा पोलिसांनी ज्योती मल्होत्राला ताब्यात घेतलं, तेव्हाच तिचा लॅपटॉप, मोबाईल आणि इतर महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तपास संस्थांनी तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून तब्बल 12 टीबी एवढा डेटा जप्त केला. तेव्हा या डेटामध्ये कॉल रेकॉर्डिंग, चॅटिंग, कॉल डिटेल्स आणि पैशांचे व्यवहार झाल्तयाचं दिसून आलं. आणि या पुराव्यांमधून ज्योती मल्होत्राचं पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचंही दिसून आलं होतं.

याशिवाय अलीकडेच ज्योती मल्होत्राचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओमध्ये ती लाहोर शहरात व्लोग करताना दिसत होती. आणि विशेष बाब म्हणजे तिच्या या व्लोगमध्ये तब्बल ६ अंगरक्षक ज्योतीचं रक्षण करताना दिसत होते. आणि या सर्व अंगरक्षकांच्या हातात एके 47 बंदूक असल्याचं अगदी स्पष्टपणे दिसत होतं. त्यामुळे आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

Jyoti Malhotra, who is in jail, spoke out in front of her father!

महत्वाच्या बातम्या