विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Bangladesh Liberation भारत आणि बांगला देश १६ डिसेंबरला विजय दिवस साजरा करतात. १९७१ मधील या युद्धात पाकिस्तानला ऐतिहासिक पराभव झाला आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश म्हणून उदयास आला. भारतीय सैन्याचे शौर्य सर्वश्रुत आहे, परंतु या विजयामागे काही अदृश्य हातही सतत काम करत होते. ते म्हणजे रॉचे गुप्तहेर. त्यांनी युद्धाच्या महिन्यांपूर्वीच पाकिस्तानचा कणा मोडणारी गुप्त तयारी केली होती.Bangladesh Liberation
१९६२ चे चीन युद्ध आणि १९६५ चे पाकिस्तान युद्धानंतर भारताला मजबूत बाह्य गुप्तचर यंत्रणेची गरज दिसली आणि १९६८ मध्ये रॉची स्थापना झाली. पहिले प्रमुख आर. एन. काव यांनी या संस्थेला गुप्त मोहिमा, माहिती संकलन आणि धोरणात्मक कामगिरीत सक्षम बनवले.Bangladesh Liberation
रॉने १९६९ मध्येच भारत सरकारला पूर्व पाकिस्तानात असंतोष वाढल्याचा इशारा दिला. भाषिक, आर्थिक आणि राजकीय भेदभावामुळे बंगाली जनता संतापलेली होती. रॉने सांगितले होते की हा संताप लवकरच हिंसाचारात बदलू शकतो. तो अंदाज अचूक ठरला.Bangladesh Liberation
१९७१ मध्ये पाकिस्तानने ‘ऑपरेशन सर्चलाईट’ सुरू करून पूर्व पाकिस्तानातील लोकांवर निर्दयी दडपशाही केली. हजारो हत्याकांड, लैंगिक अत्याचार आणि हिंदूंचा तर अधिकच छळ होत होता. दहा लाखांहून अधिक बंगाली भारतात पळून आले. मानवी संकट वाढत असताना रॉने या परिस्थितीत भारतासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली.
काव यांनी तयार केलेल्या ‘काओ प्लॅन’ अंतर्गत रॉने पाकिस्तानात गुप्त जाळे उभे केले. सैन्य हालचालींची माहिती गोळा केली. बंगाली प्रशासनातील अधिकाऱ्यांना गुप्त संपर्क बनवले. त्याचवेळी मुक्ती बहिनीला संघटित करून त्यांना शस्त्रसज्ज केले. रॉ आणि भारतीय सैन्याने सुमारे एक लाख युवा लढवय्यांना प्रशिक्षण दिले. त्यांनी पूल, रेल्वे लाईन, शस्त्रोगारे आणि संप्रेषण यंत्रणा उध्वस्त करत पाकिस्तानी सैन्याचा आतून गळा पकडला. पाकिस्तानी प्रशासन अनेक भागांत कोसळले.
याचदरम्यान रॉने एक धाडसी गुप्त मोहिम राबविली. ‘गंगा’ विमानाचे हायजॅकिंग झाल्याने पाकिस्तानला भारतावरून हवाई उड्डाणांचा वापर थांबवावा लागला. यामुळे त्यांच्या सैन्य पुरवठ्याला मोठा फटका बसला. पश्चिम ते पूर्व पाकिस्तान सैनिक आणि रसद पोहोचवण्यासाठी ५५०० किमी समुद्री मार्ग वापरावा लागला. या उशिरामुळे पाकिस्तान पूर्णपणे वेगळा झाला
On 16 December 1971, Lt Gen AAK Niazi handed over his epaulets and revolver to the Indian Forces, marking the unconditional surrender of Pakistani Forces. Dacca erupted in joy as power was transferred to the new Government of Bangladesh.
India’s armed forces,… pic.twitter.com/bzG0EcRjJy
— Indian Air Force (@IAF_MCC) December 16, 2025
रॉने चिटगांव हिल ट्रॅक्ट्समध्ये ऑपरेशन ईगल राबवले. तिबेटी कमांडोनी पाकिस्तानी तुकड्यांची मोठी हानी केली. पाकिस्तान पूर्व फ्रंटवर पूर्णपणे कमकुवत झाला.
रॉच्या आणखी एका अचूक अंदाजामुळे भारत मोठ्या संकटातून वाचला. पाकिस्तान वायुदलाच्या हल्ल्यापूर्वीच रॉने भारतीय वायुदलाला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानचे हल्ले प्रभावी ठरू शकले नाहीत आणि भारतीय विमानतळ सुरक्षित राहिले.
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने अधिकृत युद्ध सुरू केले. पण रॉमुळे भारतीय सैन्य आधीपासूनच तयार होते. फक्त १३ दिवसांत पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक शरण आले. १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका येथे पाकिस्तानने ऐतिहासिक आत्मसमर्पण केले आणि बांगलादेशची निर्मिती झाली.
रॉचे गुप्त प्रयत्न, मिळवलेली माहिती, मनोवैज्ञानिक युद्ध, मुक्ती बहिनीला दिलेली मदत आणि पाकिस्तानचा पुरवठा रोखण्याची रणनीती. या सर्वामुळे भारतीय सैन्याला सरळ विजयाचा मार्ग तयार झाला.
RAW’s Secret Hand in Bangladesh Liberation, The Hidden ‘Dhurandhars’ Behind India’s Decisive Victory
महत्वाच्या बातम्या
- Manikrao Kokote : माणिकराव काेकाेटे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार, सदनिका घाेटाळ्यात दाेन वर्षांची शिक्षा कायम
- Raj-Uddhav : राज – उध्दव युतीची बातमी लवकरच, मनसे- शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा
- मनरेगातून महात्मा गांधी यांचे नाव हटवण्यावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ
- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल – सोनिया गांधी यांना दिलासा, न्यायालयाने ईडीला फटकारले