विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकूने वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. वांद्रेतील घरात रात्री अडीचच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चोरानं सैफवर सपासप सहा वार केले. या हल्ल्यात सैफ रक्तबंबाळ झाला. सैफला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
साडेतीन वाजण्याच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. लीलावती रुग्णालयाच्या सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सेफच्या हेल्थबाबत महत्त्वाची माहिती दिली.
मुंबईतील वांद्रे परिसरात सैफ अली खानच्या घरी सुरक्षा असतानाही चोर घरात घुसला. रात्री अडीच वाजता चोरीच्या बहाण्याने आलेल्या चोरानं सैफवर चाकूनं वार केले.चाकूचा एक घाव त्याच्या मणक्याजवळ लागला आहे.
न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि एनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या मणक्यात आतापर्यंत किती घाव गेला त्याची माहिती समजू शकते असं डॉ. उत्तमानी यांनी सांगितलं.
सध्या सैफची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्याच्यावर शस्रक्रिया करावी लागणार असल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. चाहत्यांनाही ही बातमी कळल्यानंतर चाहते सैफ लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
सैफवर वार करणाऱ्या चोराचं सैफच्या मोलकरणीसोबत भांडण झालं. सैफ तिला वाचवण्यासाठी पुढे आला आणि चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोर कोण होतं हे अद्याप समजू शकलं नाही? पोलीस या हायप्रोफाईल प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
Saif Ali Khan stabbed by thieves, seriously injured in hospital
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती