Chandrasekhar Bawankule : मस्साजोगच्या ग्रामस्थांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संताप, धस – मुंडे भेटीवरून राजकारण करत असल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

बीड : Chandrasekhar Bawankule मंत्री धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घडवून आणल्याने मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. बावनकुळे यांनी सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट घालून दिली, 25 दिवसानंतर हा विषय कसा वर येतो?. बावनकुळे याना याच्यात काहीतरी राजकारण करायचं आहे. सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. हे प्रकरण भरकटण्याचा प्रयत्न बावनकुळे करत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.Chandrasekhar Bawankule

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मस्साजोग ग्रामस्थांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत धस आणि मुंडे यांच्या भेटीवरून ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थ म्हणाले, सुरेश धस अण्णांवर विश्वास आहे. मनोज दादा पाटील आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एखादा माणूस या प्रकरणात पूर्णपणे स्टँड घेतो आणि अचानक भेटतो तेव्हा मनोज दादा चिडणे सहाजिक आहे. बावनकुळे साहेब तुम्ही भेट घालून आणली तर त्या दिवशी सांगायला पाहिजे होते. ,



तुम्ही गैरसमज का पसरवत आहात?”बावनकुळे साहेब एक दिवस गावाच्या इथली परिस्थिती पहा. संतोष देशमुख हे भाजपाचे बूथ प्रमुख होते. त्यांनी निस्वार्थपणे भाजपाचे काम केलं. शरद पवार यांची प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी इथे येऊन लोकांच्या भावना जाणून घेतल्या. बावनकुळे साहेब भाजपाचे मोठे नेते आहेत, त्यांनी इथे यायला पाहिजे होतं. लोकांच्या व्यथा जाणून घ्यायला पाहिजे होत्या” असं ग्रामस्थ म्हणाले. “त्यांनी तसं न करता धनंजय मुंडे व सुरेश धस यांची भेट घडवून आणली या प्रकरणाला डिव्हाईड करण्याचा प्रयत्न बावनकुळे साहेबांनी केला” असं ग्रामस्थांच म्हणणं आहे.

लोकसभेच्या अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा प्रखरतेने मांडावा, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विशेष लक्ष द्यावं” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

Villagers of Massajog angry with Chandrasekhar Bawankule, accused of playing politics over Dhas-Munde visit

महत्वाच्या बातम्या