विशेष प्रतिनिधी
मुंबई: Manikrao Kokate मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का असं प्रश्न विचारला जातोय. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate ) यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळेपर्यंत कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असणार आहे.
कमी दरात सदनिका खरेदी केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना तसे ठरवले होते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटे (Manikrao Kokate) यांची आमदारकीही रद्द होण्याचे शक्यता आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यासारखेच कोकाटे यांचे आमदारकी रद्द करण्याची धाडस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दाखवतील का असा प्रश्न विरोधक विचारतायेत.
दोन वर्षांपूर्वी नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुनील केदार यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता पण दोषसिद्धीची याचिका फेटाळली होती. न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनी लगेच सुनील केदार यांना अपात्र ठरवले होते. केदार यांच्या अपात्रतेसाठी विधिमंडळ सचिवालयाने दाखवलेली तत्परता गेल्यावर्षी कोकाटे यांच्याबाबत दिसली नव्हती.
दरम्यान, माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate लिलावती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. जिल्हा न्यायालयाने कोकाटे प्रकरणी स्पष्ट आदेश पारित केल्यानंतर याचिका करतानी कोर्टात धाव घेतली. कोकाटे यांचे विरोधात अटक वॉरंट जारी करा अशी मागणी केली होती.
याबाबत याचिकाकर्त्यांची वकील आशुतोष राठोड यांनी सांगितले की ,माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटकेचे आदेश पारित झाले आहेत त्यांना लवकरच पोलिसांच्या शरण जाणे गरजेचे आहे, तसे न केल्यास पोलिसांनी कोकाटे यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. Minister Manikrao Kokate
कोकाटे यांनी नैतिक आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांकडे विधी व न्याय विभाग आहे. आता तरी कोकाटे यांचा राजीनामा घेऊन हे कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली.