विशेष प्रतिनिधी
पुणे : जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील १७ नगराध्यक्षपदांपैकी १० ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं बाजी मारली आहे. शिवसेनेने चार तर भाजपाने तीन जागा जिंकल्या आहेत. एकही जागा महाविकास आघाडीला जिंकता आली नाहीय. नगराध्यक्षपदासाठी ११९ उमेदवार रिंगणात होते. पुणे जिल्ह्यात अजित पवार यांनी दबदबा कायम राखत जिल्ह्यात आपणच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले आहे.
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडून आलेले नगराध्यक्ष
नगरपंचायत/परिषद – नगराध्यक्ष – पक्ष
बारामती – सचिन सातव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
लोणावळा – राजेंद्र सोनवणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
तळेगाव – संतोष दाभाडे – भाजपा महायुती
दौंड – दुर्गादेवी जगदाळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
चाकण – मनीषा गोरे – शिवसेना
शिरूर – एश्वर्या पाचरणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
इंदापूर – भरत शाह – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सासवड – आनंदी काकी जगताप – भाजपा
जेजुरी – जयदीप बारभाई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
भोर – रामचंद्र आवारे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आळंदी – प्रशांत कुऱ्हाडे – भाजपा
जुन्नर – सुजाता काजळे – शिवसेना
राजगुरुनगर – मंगेश गुंडा – शिवसेना
वडगाव मावळ – आंबोली ढोरे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
मंचर – राजश्री गांजले – शिवसेना
माळेगाव – सुयोग सातपुते – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
उरुळी-फुरसुंगी – संतोष सरोदे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Ajit Pawar Emerges as ‘Dada’ in Pune District as NCP Clinches 10 of 17 Nagaradhyaksha Posts
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला