Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Shashikant Shinde राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणानंतर आम्ही पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवारांकडे सोपवणार होतो, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला आहे.



शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ‘राष्ट्रवादी’ साप्ताहिकातून विलीनीकरणाच्या मुद्यावर सविस्तर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करून एक समर्थ व एकसंघ पक्ष उभा करण्याचे आमचे स्वप्न होते. विशेष म्हणजे या नव्या रचनेत पक्षाची सर्व धुरा अजितदादांच्या खांद्यावर सोपवून त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाील काम करण्याचे आम्ही निश्चित केले होते. दुर्दैवाने काळाने आघात घातला आणि दादांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. दादांच्या निधनामु्ळे पक्षाचे व राज्याचे मोठे नुकसान झाले.
शशिकांत शिंदेंनी आपल्या लेखात पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मन मोठे करण्याची भावनिक सादही घातली आहे. अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणे ही आता आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे मन मोठे करणे आवश्यक आहे. व्यक्तिगत मतभेद, अहंकार व कटुता बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. आपण पुन्हा एकदा एकत्रित होऊन पक्ष मजबुतीने उभा करू शकलो, तर तीच अजित पवारांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.

अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील विलीनीकरणाच्या कथित चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. विशेषतः अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाची चर्चा धुडकावून लावली असल्याची चर्चा आहे.

अजित पवार बाहेर का पडले?

शशिकांत शिंदे यांनी अजित पवार पक्षाबाहेर का पडले? या प्रश्नावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्यानाट्या आरोपांमुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. पण झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण करायचे असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, पवार साहेब व आमच्याशी बोलत होते. महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही पक्षांची युती घडवून आणली होती व ते स्वतः हिरीरीने प्रचाराची आघाडी सांभाळत होते, असे शिंदे म्हणालेत.

शरद पवार विलीनीकरणाच्या चर्चेपासून अलिप्त

उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप स्वतःला या विलीनीकरणाच्या चर्चेपासून अलिप्त ठेवले आहे. जाहीर सभा किंवा मुलाखतींमध्येही त्यांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही. पण अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय होणार होता असे सांगून पडद्यामागे बरेच काही घडत होते याची वाच्यता केली होती. सूत्रांच्या मते, पडद्यामागे दोन्ही गटांना पुन्हा एका छताखाली आणण्यासाठी जोरदार हालचाली व वाटाघाटी सुरू आहेत. कुटुंबातील व्यक्तीचे निधन व पक्षाची भविष्यातील ताकद या दोन्ही गोष्टींचा विचार करून दोन्ही बाजूंचे ज्येष्ठ नेते या प्रकरणी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Ajit Pawar will lead NCP after merger, claims Shashikant Shinde

महत्वाच्या बातम्या