विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray शिवसेना ठाकरे गट गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करेनासा झाला आहे. उलट मुख्यमंत्र्यांचे जास्तीत जास्त कौतुक सुरू आहे. आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांची कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.Aditya Thackeray
आदित्य ठाकरे यांनी एक या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे. एकनाथ शिंदे विधिमंडळात उत्तर द्यायला उभे राहत नाहीत, असा आरोप करताना आदित्य ठाकरे म्हणतात, विधानसभेत उपमुख्यमंत्री मिंधे ह्यांनी स्वतःला उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून किंवा लोकप्रतिनिधींचा जाणून बुजून अपमान करायचा म्हणून, स्वतःकडील खात्यांच्या उत्तरांची जबाबदारी घाईघाईने इतर मंत्र्यांवर सोपवली. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री असताना किंवा आता मुख्यमंत्री असतानाही स्वतः प्रश्नोत्तरांना उभे राहतात. अजित दादाही स्वतः प्रश्नांची उत्तरे देतात, पण काहींकडे मात्र उत्तरंच नसल्याने किंवा लोकप्रतिनिधींना तोंड देण्याची क्षमताच नसल्याने स्वतःवरची जबाबदारी झटकण्याची वेळ आलीये.
मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज पुन्हा एकदा त्यावर शिक्कामोर्तब झालं! माझा सवाल मुख्यमंत्र्यांना आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना आहे की अश्या विधीमंडळाचा, लोकप्रतिनिधींचा अपमान करणाऱ्या अकार्यक्षम व्यक्तीसोबत बाकांवर बसणं कसं सहन होतं? असेही ठाकरे म्हणाले आहेत.
पण… ज्या राज्यात बलात्कार शांततेत पार पडला- अश्या प्रकारचे भयंकर उद्गार काढणाऱ्या मंत्र्यांना पदावरुन काढून न टाकता अभय दिले जाते, त्या मंत्रीमंडळाकडून जनता काय अपेक्षा ठेवणार? सक्षम मंत्रीमंडळ असते तर तातडीने अश्या मंत्र्यांची हकालपट्टी केली असती, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. शिंदे गटाचे आमदार आणि गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी हे वक्तव्य केले होते.
Appreciating the Chief Minister, Aditya Thackeray attacked Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल