विशेष प्रतिनिधी
सातारा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहेत. यामुळे आता मतपेट्या पुढील 15-16 दिवस गोडाऊनमध्ये पडून राहतील. हा कालावधी सरकारला त्यामध्ये काही ‘घालमेल’ किंवा फेरफार करण्यासाठी पुरेसा आहे,” अशी भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. Prithviraj Chavan
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर होणार होता. मात्र, हायकोर्टाच्या आदेशामुळे आता हा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निर्णयावर संताप व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, “निवडणूक आयोग किती अक्षमतेने काम करत आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे. मतमोजणी इतके दिवस पुढे ढकलल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे. 15 दिवस मतपेट्या सुरक्षेत असल्या तरी, सत्ताधाऱ्यांना त्यात गडबड करायला भरपूर वेळ मिळणार आहे, अशी शंका घेण्यास वाव आहे.”
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल निकाल लांबणीवर पडण्यास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा दावा करताना चव्हाण म्हणाले, हे प्रकरण जेव्हा न्यायालयात सुरू होते, तेव्हा सरकारी वकिलांनी प्रभावीपणे बाजू मांडणे अपेक्षित होते. जर सरकारने योग्य युक्तिवाद केला असता, तर निकाल पुढे ढकलण्याची वेळ आली नसती. मात्र, न्यायालयात सरकारला अपयश आले आणि आता त्याचे खापर निवडणूक आयोगावर फोडले जात आहे.
गेली 10 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे भाजपने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. हा लोकशाही संपवण्याचा डाव असून, देशात हळूहळू हुकूमशाहीची पावले उमटत आहेत. जनता जागृत झाली नाही, तर असेच सुरू राहील. सरकार आणि आयोग केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकार झोपले होते का?” असा हल्लाबाेल चव्हाण यांनी केला.
Ballot boxes in warehouse, enough time for government to change hands, Prithviraj Chavan fears
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर