विशेष प्रतिनिधी
बारामती: भिगवण येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे उद्या (दि. २३) बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज संबंधित प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले.
या बंदला पाठिंबा दर्शवत बारामती व्यापारी महासंघानेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, उद्या दुपारी १२.०० वाजेपर्यंत बारामती शहरातील बाजारपेठेतील सर्व प्रकारचे व्यापारी व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
हा बंद शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात यावा, तसेच या बंदमध्ये सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन बारामती व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येण्याची शक्यता असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील भिगवण प्रकरणातील अपहरण झाल्याची तक्रार असलेली मुलगी शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली. संबंधित तरुणासह मुलगी भिगवण पोलीस ठाण्यात पोहोचली. यानंतर पोलीस संबंधित तरुणाला दुसरीकडे घेऊन गेले होते. यानंतर मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. पोलिसांनी संबंधित तरुणीला साडे बारा वाजता कोर्टात हजर केलं. यानंतर संबंधित तरुणीची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, मुलाची चौकशी करुन निर्णय घेतला जाणार आहे.
भिगवण घटनेतील मुलीला सुधार गृहात तिची रवानगी करण्यात आली. तर मुलाबाबत चौकशी करून पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण घटनेतील युवतीला कोर्टात हजर केल्यानंतर तिचा जबाब नोंदवला गेला. जबाब नोंदवल्यानंतर मुलीचे मेडिकल करून पुनर्वसन केंद्रात तिची रवानगी करण्यात आली. तर मुलाबाबत चौकशी करून पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मुलगा आणि मुलगी भिगवममधून बाहेर पडल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती दिली. मुलीच्या आई आणि भावाचं म्हणणही ऐकून घेतलं आहे. त्या मुलीने आपल्या आई आणि भावासमोर देखील आपलं म्हणणं मांडलं आहे. मात्र तिच्या आई आणि भावाचा वेगळा आरोप असल्याने आम्ही आता आणखी चौकशी करत आहोत. संबंधित तरुणीने कोर्टासमोरही तिचं सगळं म्हणणं मांडलं आहे.
संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेलो, असं म्हटलं आहे. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.
Baramati, Daund and Indapur to Observe Shutdown Tomorrow Over Bhigwan Incident
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका