विशेष प्रतिनिधी
सोलापूर: Uttamrao Jankar ‘राष्ट्रप्रथम’ नाही तर ‘भ्रष्टप्रथम’ आणि ‘मुस्लिम खतम’ हेच भाजपचे नवे स्लोगन आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तब्बल 300 कोटी रुपये पाठवले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये वाटपासाठी आले असून, भाजप हा सध्याचा सर्वात भ्रष्ट पक्ष बनला आहे,” असा दावाही जानकर यांनी केला.
उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी एका प्रचारसभेत बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले, ”सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तब्बल 300 कोटी रुपये पाठवले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये वाटपासाठी आले असून, भाजप हा सध्याचा सर्वात भ्रष्ट पक्ष बनला आहे.’ मी स्वतः 30 वर्षे भाजपमध्ये होतो. तेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या काळात ‘राष्ट्रप्रथम’ हे पक्षाचे ब्रीदवाक्य होते. मात्र, आताच्या भाजपमध्ये भ्रष्ट लोकांची भरती झाल्याने पक्षाची ‘गटारगंगा’ झाली आहे. आता ‘भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम’ हेच भाजपचे नवीन स्लोगन बनले आहे. तत्त्वशून्य राजकारण आणि केवळ भ्रष्टाचार, या एकाच मुद्द्यावर हे सर्व एकत्र आले आहेत.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना जानकर म्हणाले, जिथे भाजप चौथ्या क्रमांकावर आहे, तिथे ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मत आम्हाला द्या’, अशी लाचारीची भाषा पालकमंत्री वापरत आहेत. सध्या राज्यात तीन पक्षांच्या सरकारचे जे चित्र आहे ते फार काळ टिकणारे नाही, यातून लवकरच मोठा स्फोट झालेला दिसेल.
BJP Sent 300 Crore Rupees to Win Solapur Municipalities, Alleges Uttamrao Jankar
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर