विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनावर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त करत सर्वपक्षीय बैठक बाेलावण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दाेन दिवसांपूर्वी हैद्राबाद येथे बाेलताना नागरिकांनी पेट्राेल डिझेलचा वापर कमी करावा, वर्क फ्राॅम हाेम करावे, साेनखरेदी करू नये तसेच परदेशात विवाहसाेहळे करू नयेत असे आवाहन केले हाेते. यावर साेशल मीडियावर केलेल्या पाेस्टमध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे की या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आ सध्याची परिस्थिती हे. चिंताजनक असून केंद्र सरकारने अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी करताना शरद पवार यांनी म्हटले आहे की राष्ट्रीय हिताशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेताना सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. देशासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीत एकत्रित चर्चा आणि व्यापक सल्लामसलत गरजेची आहे. केंद्र सरकारने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. देशहिताच्या मुद्द्यांवर सामूहिक निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी ठरू शकते.
अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध तज्ज्ञांची तातडीने बैठक घेण्याचीही मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा सखोल आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करूनच पुढील निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी सुचवले. देशातील जनतेमध्ये विश्वास, स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हेच सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी मांडली.
शरद पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी ( @narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा.
देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे.
Call all-party meeting: Sharad Pawar urges Centre after PM’s austerity appeal
महत्वाच्या बातम्या
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
- Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती
-
‘पंचवटी’वरून गदिमा कुटुंबात वाद; पुनर्विकासाच्या हालचालींना सौमित्र माडगूळकर यांचा तीव्र विरोध