विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येकवेळी कुणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणुका पुढे जातील. असे आजवर कधीच झाले नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयाेगाला सुनावले.
राज्यातील अनेक नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री म्हणाले, निवडणूक आयोग कुठला कायदा काढतंय किंवा आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण मी जो कायदा पाहिला, जेवढा माझा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशीही बोललो, या सर्वांचे मत आहे की, अशा पद्धतीने या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीत. हे अतिशय चुकीचे आहे. पण निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांना निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. पण माझे मत आहे की, निवडणूक आयोगाने निवडणुका लांबणीवर टाकलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर झालेला हा अन्याय आहे. उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही ती लांबणीवर टाकता, यामुळे त्यांचे श्रम व मेहनत वाया गेली. आता 15 – 20 दिवस त्यांनी पुन्हा प्रचार करायचा. सरकार या प्रकरणी निवडणूक आयोगापुढे सादरीकरण करून हा निर्णय चुकीचा आहे हे सांगेन, .
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या न झालेल्या भेटीबाबत मुख्यमंत्रक्ष मी रात्री लवकर आलो व सकाळी लवकर जात असल्यामुळे आमची भेट झाली नाही. माध्यमांना आता दिवसभरासाठी खाद्य मिळाले आहे. पण मी रात्री उशिरा आलो. आज सकाळी 1 तास लवकर जात आहे. कारण, मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या सभेनंतर 1 तास नंतर आहे. त्यामुळे भेट झाली नाही. उद्या होईल, त्याला काय? शेवटी आम्ही दोघेही प्रचारात मग्न आहोत. आमचे फोनवर रोजच बोलणे होते. त्यामुळे आता भेट झाली किंवा न झाली हा विषय नाही. ते अजून तयार व्हायचेत. मला लवकर निघायचे आहेत. कारण माझ्या सभा लवकर ठेवल्यात. यात कोणती मोठी गोष्ट आहे. तुम्ही चालवा दिवसभर झाली नाही भेट म्हणून, असे फडणवीस हसत म्हणाले.
शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर टाकण्यात आलेल्या छापेमारीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, मला याची कल्पना नाही. पण कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे यावरून छापा ठरत नाही. आमच्याही एखाद्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार आली तर त्याही प्रकरणात चौकशी होते. माझीही गाडी तपासली जाते. त्यामुळे या प्रकरणी सत्ताधारी किंवा विरोधक अशा कोणत्याही गोष्टी नसतात.
Cancelling elections is very wrong, Chief Minister Devendra Fadnavis targets Election Commission
महत्वाच्या बातम्या
- Lt Gen Manjinder Singh : लेफ्टनंट जनरल म्हणाले- पाकने 90 तासांत गुडघे टेकले, ऑपरेशन सिंदूरमध्ये दीर्घ लढाईची तयारी होती
- Adani : अदानींनी 5 वर्षांपूर्वीचा कायदेशीर खटला संपवला; कोळसा खाण प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या कार्यकर्त्याशी समझोता
- पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंबर कसून उतरल्या का नाहीत??
- भय्याजींच्या दूरदृष्टीतून ईशान्य भारतात ईश्वरी कार्य ऊभे; भैय्याजी जोशींचे गौरवोद्गार; भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता