विशेष प्रतिनिधी
हिंगोली: Santosh Bangar शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत बांगर यांना खडेबोल सुनावले आहे.Santosh Bangar
हिंगोलीतील कळमनुरी येथे मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. मात्र मतदान केंद्रातील त्यांच्या वागणुकीमुळे वादाला तोंड फुटले आहे. कारण, बांगर यांनी मतदान केंद्रातच महिला मतदाराला प्रत्यक्ष ईव्हीएम बटन दाबताना मार्गदर्शन केले. तसेच “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं”, अशी घोषणाबाजी मतदान केंद्रातच केली. याचदरम्यान मोबाइल फोनचा वापरही त्यांनी केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मतदान केंद्रात घोषणाबाजी, मोबाइल वापरणे किंवा मतदाराला कोणताही निर्देश देणे हे निवडणूक गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते.Santosh Bangar
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा फडणवीसांनी आमदार बांगर यांच्यावर संताप व्यक्त करत म्हटले की, किमान लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसे वागतोय, आपण कोणता संदेश देत आहोत, याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत फडणवीसांनी बांगर यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. पण, आता संतोष बांगर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुद्धा तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितले होते की, गोपनीयतेचा भंग झाला असल्याचे आढळल्यास संतोष बांगर यांच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यानुसार आता काही तासांतच बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Case registered against MLA Santosh Bangar for violating privacy at polling station
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर