विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chhagan Bhujbal संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है, सफलता का सुरज उतना ही तेज चमकता है| सवाल जहर का नहीं था, वो तो मै पी गया, तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं फिर भी जी गया, अशी शेरोशायरी करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी विराेधकांचा समाचार घेतला. मला जे प्रेम दिले ते महायुतीच्या उमेदवारांना प्रेम द्या, असे सांगत निवडून देण्याचे आवाहन केले.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी थेट रुग्णालयातून प्रचारसभेत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप असलेल्या अवस्थेत छगन भुजबळ यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले. सोशल मीडियावर छगन भुजबळ यांच्या प्रचाराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. छगन भुजबळ यांनी रुग्णालयातून येवलावासियांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
नुकतीच शस्त्रक्रिया झालेली असल्याने इच्छा असूनही आज येवल्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही. पण मी नेहमी येवलेकरांच्या सोबतच आहे.
येवलेकरांनी २००४ मध्ये मला पहिल्यांदा संधी दिली आणि मी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आजवर हजारो कोटींची कामे घडवून आणत… pic.twitter.com/PFuFwWhU71
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) November 30, 2025
भुजबळ म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर इथे आलो आणि विकासकामे केलीमाझी इच्छा असताना नगरपरिषद निवडणुकांमध्ये सहभाग घेता आला नाही. विकासाच्या मुद्द्यावर इथे आलो आणि विकासकामे केली. २००४ मध्ये मला काम करण्याची, सेवा करण्याची संधी येवल्यात मिळाली. हजारो कोटी रुपयांची कामे करायला मिळाली. त्यासाठी आपली साथ होती. अनेक कामे मतदारसंघात केली, म्हणून तुम्ही मला ५ वेळा निवडून दिले. आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्वच उमेदवारांना आपण निवडून द्याल. आगामी काळात विकासकामे करणार आहोत त्याचा वचननामा आपल्याकडे पोहोचला आहे. येवल्यात नसलो तरी समीर, पंकज येवल्यात रात्रंदिवस काम करत आहेत.
Chhagan Bhujbal fires poetic shot at opponents, says they were hurt by my survival
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर