विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal मागच्या काही महिन्यात राज्यातील काही घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. यंत्राचा, तंत्रांचा,मंत्रांचा हा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बहिणाबाई यांच्यासह विविध महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. मात्र या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यापासून दृष्ट लागली आहे, अशी खंत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.Chhagan Bhujbal
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावाला पाठिंबा देताना छगन भुजबळ यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडून राज्यातील वाढती गुन्हेगारी, कांदा, नाशिक कुंभमेळा, महाराष्ट्र कर्नाटक प्रश्न यासह विविध विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत होते.
विकास करायला पाहिजे, पण त्याला मानवी चेहरा असला पाहिजे पण माणसालाच जर जनावरासारखं मारलं जात असेल तर विकास काय कामाचा? बीडचे संपूर्ण प्रकरण आणि फोटो पाहून खूप वेदना झाल्या. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला, या प्रकरणाची चौकशी करणार की नाही? की त्यातही दलित आहे म्हणून भेदभाव करणार? असा सवाल भुजबळ यांनी केला. सभागृहाकडून प्रत्येकाला न्यायाची अपेक्षा असते, असेही ते म्हणाले.
बीडमध्ये संतोष देशमुख यांची घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेचा निषेध करतो. आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे परभणी मध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडला आहे. या प्रकरणाची चौकशी होणार की नाही? तो दलित मागासवर्गीय आहे म्हणून कारवाई होणार की नाही? लातूरमधील माऊली सोट या धनगर समाजाच्या मुलाला मारहाण करण्यात आली कुणी बोलणार की नाही हा महाराष्ट्र चालला आहे कुठे? परवा शिवमंदिरात गेला म्हणून जालन्यात कैलास बोऱ्हाडे या धनगर व्यक्तीला लोखंडी सळईने चटके देण्यात आले या प्रकरणावर कुणी बोलणार आहे की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित करत न्याय हा सर्वांसाठी समान असला पाहिजे असे मत व्यक्त केले.
Chhagan Bhujbal has seen the regret for the past few months
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल