विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tanaji Sawant आरोग्य विभागातील टेंडर मधील कथित भ्रष्टाचाराचा आरोप आणि चर्चेत आलेले माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट नाकारण्याचे वृत्त आहे.Tanaji Sawant
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) पूर्णपणे गैरहजर होते. मात्र सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली. पहिल्याच दिवशी त्यांनी कामकाजात सहभाग नोंदवला. विधानसभेचे कामकाज आटोपल्यावर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले.
देवेंद्र फडणवीस भाजपच्या इतर मंत्र्यांसोबत बैठकीत व्यस्त होते. सागर बंगल्याच्या प्रवेशद्वारावरच तानाजी सावंत काही वेळ होते. मात्र काही मिनिटांत त्यांना भेट नाकारल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सावंत भेटीविना माघारी वळले.
तानाजी सावंत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्याबाहेर तानाजी सावंत हे उभे होते. ते बंगल्याबाहेर उभे असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. तानाजी सावंत हे फडणवीसांच्या भेटीसाठी बंगल्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी याची वाट पाहताना दिसत आहेत. तानाजी सावंत जवळपास तीन ते पाच मिनिटे बंगल्याबाहेर वाट पाहत उभे होते. यानंतर सुरक्षा रक्षकांनी बंगल्याचं गेट उघडलं. यानंतर ते बंगल्यात गेले. पण तरीही त्यांची फडणवीसांसोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात तानाजी सावंत यांना फडणवीसांची भेट न घेताच परतावं लागलं.
तानाजी सावंत राज्याचे आरोग्य मंत्री असताना काही निर्णय घेतले होते. त्यांनी दिलेल्या काही आदेशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.
Chief Minister denied meeting with Tanaji Sawant?
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल