जयंत पाटलांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांचा रोहित पवार, वरुण सरदेसाई यांना टोला
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister devendra Fadanvis राष्ट्रवादी काँग्रेस शरद पर गटचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई हे बालिश वक्तव्ये करतात यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत चांगलाच टोला लगावला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कौतुक केले.Chief Minister devendra Fadanvis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात गुंतवणुकीची माहिती देत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टिपणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, जयंत पाटलांनी तरी चुकीची माहिती देऊ नये. रोहित पवार, वरुण सरदेसाई बोलले असते तर समजून घेतलं असतं. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही.
तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य वेळी योग्य लोकांसोबत सांगितल्या पाहिजे. जयंत पाटील यांनी अशी चुकीची माहिती देऊ नये. रोहित पवार, वरुण सरदेसाई असं बोलले असते तरी समजून घेतलं असतं. पण जयंत पाटलांकडून अशी चूक अपेक्षित नाही, असे म्हणत पाटील यांनाही त्यांनी टोला लगावला.
जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. यामागे रोहित पवार यांच्याशी असलेले त्यांचे वाद हे कारण सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमके त्यावरच बोट ठेवत रोहित पवार यांना चिमटा घेतला.
Chief Minister praises Jayant Patil, takes a dig at Rohit Pawar, Varun Sardesai
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल