Sangameshwar : संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात घोषणा

Sangameshwar : संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात घोषणा

Sangameshwar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sangameshwar छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यात कैद झाली होती. हा वाडा अधिग्रहित करून तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केली.Sangameshwar

छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे वास्तव्य असलेले ठिकाण म्हणजे संगमेश्वरातील सरदेसाई वाडा. छावा चित्रपटानंतर सरदेसाई वाडा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. त्यामुळे राज्यसरकाने संगमेश्वरातील ऐतिहासिक सरदेसाई वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी छत्रपती संभाजी महाराज जिथे शेवटच्या क्षणी होते त्या सरदेसाई वाड्याच्या ठिकाणी सरकारने स्मारक तयार करावे, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ संगमेश्वरातील सरदेसाई वाडा अधिग्रहित करून तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले जाईल. उचित आणि छत्रपती संभाजी महाराजांना साजेसे असे स्मारक उभारू’, अशी घोषणा केली.

छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचं प्रतिक आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्यवीर आहेत तसेच ते धर्मवीर आणि स्वराज रक्षक आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था… महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’ या ओळी म्हणत ही अधिकृत घोषणा केली आहे.

कर्नाटकातील शहाजी राजांच्या स्मारकाची स्थिती योग्य नाही. आम्ही त्या सरकारशी बोलू आणि जर ते करत नसतील तर शहाजी राजेंच्या स्मारकाचा विकास करू. याबाबत भूमिका मांडू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Chief Minister’s announcement to build a memorial to Chhatrapati Sambhaji Maharaj at Sardesai Wada in Sangameshwar

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023