विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार Rohit Pawar यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मुंबई व बारामती येथील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) पत्रकार परिषद घेत तपासाबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. Ajit Pawar
पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस महासंचालक, सीआयडी Sunil Ramanand यांनी सांगितले की, संबंधित घटनेत अपघात झाला की घातपात, याचा सर्वंकष तपास सुरू आहे. “प्राथमिक टप्प्यावर कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. तपास वेगाने सुरू असला तरी पुराव्यांचे शास्त्रीय विश्लेषण पूर्ण होईपर्यंत अधिकृत निष्कर्ष जाहीर करता येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
घातपात, निष्काळजीपणा की गुन्हेगारी कृत्य?
सीआयडीकडून अपघातामागील सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घातपात (sabotage), निष्काळजीपणामुळे झालेला अपघात (rash act) किंवा इतर कोणतेही गुन्हेगारी कृत्य आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला चालवला जाईल, असे रामानंद यांनी सांगितले.
तपासात तांत्रिक बाबींना विशेष महत्त्व दिले जात असून विमानाशी संबंधित यांत्रिक माहिती, उड्डाणपूर्व तपासणी अहवाल, संवाद नोंदी (communication logs) आणि इतर डिजिटल डेटा यांचे विश्लेषण सुरू आहे.
बहुउद्देशीय यंत्रणांचा सहभाग
या प्रकरणात एकापेक्षा अधिक तपास यंत्रणा कार्यरत असल्याचे सीआयडीने स्पष्ट केले. विशेषतः विमान अपघात तपास यंत्रणा Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून स्वतंत्र अहवाल तयार केला जात आहे. “AAIB चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो सीआयडीच्या तपासात समाविष्ट केला जाईल. त्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनेक यंत्रणांकडून माहिती संकलित करावी लागत असल्याने ‘डेटा हार्वेस्टिंग’ आणि फॉरेन्सिक पडताळणीस वेळ लागत आहे. तरीही तपासाला प्राधान्य देऊन गतीने काम सुरू असल्याचे सीआयडीने नमूद केले.
पुरावे समोर, पण निष्कर्ष अद्याप नाही.
सीआयडीच्या मते, प्राथमिक टप्प्यात काही महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. मात्र, त्या आधारे अंतिम निष्कर्ष काढणे अद्याप शक्य नसल्याचे सांगण्यात आले. अधिक तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब आणि तज्ज्ञांचे मत यांनंतरच चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, घटनेच्या तपासाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सीआयडीने मात्र सर्वांना संयम बाळगण्याचे आवाहन करत, “तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही अफवा पसरवू नयेत,” असे स्पष्ट केले आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील सत्यस्थिती स्पष्ट होणार आहे.
CID’s speedy investigation into Ajit Pawar’s plane crash case; Has the possibility of arson not been ruled out?
महत्वाच्या बातम्या
- Sunetra Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार
- Manoj Jarange : माझ्या विराेधात स्टिंग ऑपरेशनचा कट, महिलेचाही सहभाग : मनाेज जरांगे यांचा दावा
- व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास बारामती पाेलीसांचा नकार, दबाव असल्याचा राेहित पवार यांचा आराेप
- बारामती पोलीस ठाण्यात ‘ब्लॅक बॉक्स’, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण