विशेष प्रतिनिधी
ठाणे: Badlapur बदलापूर (Badlapur) पश्चिम येथील गांधीनगर टेकडी एसटी स्टँड येथे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 7.30 वाजतपासून संध्याकाळी 5.30 वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चसे असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. सकाळी बदलापूर (Badlapur) नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या 43 जागांसाठी येथे मतदान होत आहे. बदलापूर पश्चिम येथील बस स्टँडजवळील मतदान केंद्र परिसरात बुथ लावणे आणि मतदारांना स्लिप वाटणे यावरुन शिवसेना (शिंदे) आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. यामुळे मतदान केंद्राजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप करुन येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
बदलापूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. येथे
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून (शिंदे) वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, शिवसेना (ठाकरे) प्रिया गवळी, अपक्ष संगीता चेंदवणकर, आस्था मांजरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सुरुवात झाल्यापासून धुसफूस सुरु आहे. ठाणे जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरुन एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना आवारा, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही सांगण्यात आले होते. शिवसेना नेते खासदार नरेश म्हस्के यांनी याबद्दलची जाहीर नाराजी व्यक्त केली होती. शिंदेंच्या मंत्र्यांनी मागील महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा निषेध केला होता. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी सत्तेतील दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.
Clashes between Shiv Sena Shinde faction and BJP workers in Badlapur
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर