तुम्ही मोठे राहिला नाहीत, हे काँग्रेसने समजून घ्यावे, वंचित बहुजन आघाडीचा सल्ला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसने मोठ्या भावाच्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला भाऊ मानू, तुमच्याशी युतीही करू. पण तुम्ही मोठे राहिला नाहीत, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी दिला आहे. Vanchit Bahujan Aghadi

सुजात आंबेडकर म्हणाले, प्रस्थापित नेत्यांना आमचं एक सांगणे आहे की, तुम्ही कधी शहाणे होणार? काँग्रेसच्या स्थानिक लीडरशिपने शहाणपण दाखवत स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हाच शहाणपणा 2019, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राज्याच्या नेत्यांनी दाखवला असता, तर त्यांचा सुपडा साफ झाला नसता, असे ते म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचितने या प्रकरणी काँग्रेसला आपण मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून बाहेर येण्याचाही सल्ला दिला आहे.



बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचितने या प्रकरणी काँग्रेसला आपण मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून बाहेर येण्याचाही सल्ला दिला बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप – जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या सूरात आता वंचित बहुजन आघाडीनेही सूर मिळवला आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, मतदान यंत्र व निवडणूक आयोग या तिघांच्या महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केला आहे.

सुजात आंबेडकर म्हणाले, आज बिहार निवडणुकीचा निकाल आला. त्यात भाजप, ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्या महागठबंधनने विजय मिळवला. या बिहार निवडणुकीत काँग्रेसने एक घोडचूक केली ती म्हणजे, काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसतांना, त्यांचे तिथे नेतृत्व नसतांना आरजेडीशी वाद घालून त्यांनी जास्तीच्या जागा घेतल्या आणि त्या जागांवर काँग्रेसला मोठा पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे बिहारमध्ये आरजेडी-काँग्रेसला फटका बसला.

Congress should understand that you are no longer big, advises Vanchit Bahujan Aghadi

महत्वाच्या बातम्या