विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याची केलेली मागणी आणि दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्याबाबत अजितदादा सकारात्मक होते असा केलेला दावा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांना भोवला. मंत्रिमंडळातील त्यांच्या जागेवर डोळा असलेल्या पक्षातीलच काही हितशत्रूंनी त्यांना जाळ्यात ओढले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. Narhari Zirwal
झिरवाळ यांचा एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओची माहिती झिरवाळ यांना आधीपासूनच होती आणि यासंदर्भात त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चाही केली होती, असे बोलले जात आहे. मात्र, ही चर्चा होऊन २४ तास उलटण्यापूर्वीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने झिरवाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
नरहरी झिरवाळ यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते. मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील एका खोलीत झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत बिछान्यावर बसलेले असून शेजारी मद्य आणि खाद्यपदार्थ दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणारा तृतीयपंथी पवन यादव असून, त्याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्यांच्या शासकीय निवासात अशा प्रकारची व्यक्ती असणे आणि तिथे अश्लील कृत्य होणे, यावरून आता नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षात नेतृत्वावरून आणि मंत्रिपदावरून मोठा संघर्ष सुरू आहे. त्यातूनच झिरवाळ यांना अडकवले जात असल्याचे बोलले जात आहे.
Demand to Appoint Sunetra Pawar as Party Chief Backfires on Narhari Zirwal
महत्वाच्या बातम्या