विशेष प्रतिनिधी
नाशिक : Dhananjay Munde संतोष देशमुख खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही. पण खून प्रकरणातील आरोपी त्यांचा जवळचा होता. त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, तसा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.Dhananjay Munde
नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचा दावा केला आहे. यावर आठवले म्हणाले, करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध सगळ्यांना माहिती आहे. करुणा मुंडे यांना माहिती मिळाली असेल तर मला त्याबद्दल माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचा मर्डर केल्याची सगळी माहिती सीआयडीला मिळाली आहे.
या खून प्रकरणात त्याची भूमिका स्पष्टपणे मांडली. मला असं वाटतं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा मोठ्या प्रमाणात जवळचा संबंध होता. पण या खुनशी काही संबंध नसेल असे काय पुरावेही नाही. अनेक वेळा पासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आहे. अजित पवार यांनी त्याचा विचार करणे आवश्यक रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला. यावर आठवले म्हणाले, त्यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला असेल तर ही बाब गंभीर आहे .पुण्यातील घटना देखील गंभीर आहेआरोपीला पकडले आहे यासाठी समाज बांधवांनी गावागावांनी एकत्र आले पाहिजे . अशी प्रवृत्ती ठेचून काढायला सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे.
-परभणी मध्ये संविधानाचा अपमान करण्यात आला होता. आमचे बौद्ध समाजाचे लोक रस्त्यावर उतरले होते . पण पोलिसांनी बेछूट लाठीमार केला पोलीस स्टेशन मध्ये पकडलेला सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. एकीकडे सुरेश धस नाशिक मध्ये येऊन आंदोलकांना समजून सांगतात की पोलिसांना माफ करा आणि संतोष देशमुखच्या आरोपींना शिक्षा पाहिजे म्हणतात. अशा पद्धतीने दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. पोलिसांना बडतर्फ करणे आवश्यक आहे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे आपण इकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. लवकरात लवकर आमच्या दलित तरुणांना न्याय मिळणे आवश्यक. देवेंद्र फडणवीस ॲक्टिव्ह मुख्यमंत्री आहेत ते दखल घेतील सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळेल.
माझी भूमिका लव्ह जिहादला पाठिंबा देणारी नाही. दोन तरुण एकमेकांच्या स्वभावाने एकत्रित झाले तर त्याला लव्ह जिहाद म्हणणं ठीक नाही. पण बळजबरी धर्मांतर करू नये, असेही ते म्हणाले.
आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत. आम्ही दलित असलो तरी आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता. मला आनंद आहे आज या ठिकाणी महंत सुधीर दास आमच्या स्वागतासाठी आले, आमच्या बुद्ध वंदनेते सामील झाले होते. त्यांनी आम्हाला काळाराम दर्शन घडवले आनंद आहे. बाबासाहेबांना सर्व एकत्र देश आणायचा होता .त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आम्ही बौद्ध आहोत. हिंदू धर्म हा देशातील सर्वात मोठा धर्म आहे .संविधानाने सर्व धर्मांना सर्व लोकांना एकत्र आणून देशाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला
Dhananjay Munde should resign as minister on the basis of ethics, Ramdas Athawale expects
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…