Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा इंदूरमध्ये मर्डर झाला असता पण भय्यूजी महाराज यांनी वाचविले, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

बीड : Dhananjay Munde धनंजय मुंडे तुमचा इंदूरमध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलवर होते याची देखील मला माहिती आहे पण मी सगळेच आता काढणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिला.Dhananjay Munde

आमदार गुट्टे यांनी गंगाखेडमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार धनंजय मुंडे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारासाठी गंगाखेड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी बोलताना मुंडे यांनी आमदार गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर सोळाशे कोटी रुपयांचे कर्ज उचलले असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आमदार गुट्टे यांनी उत्तर देताना मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार गुट्टे म्हणाले,‘धनू भाऊ मागील काही वर्षात तुमच्यावर बरेच आरोप झाले, प्रत्येकजण तुमच्या विरोधात बोलत होता. पण मी कधीच तुमच्या विरोधात एकही शब्द काढला नाही पण तुम्ही आता स्वतःहून गंगाखेडला आलात आणि माझ्या विरोधात बोललात. त्यामुळे आता मी तुमच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही. तुमचं सर्वच बाहेर काढणार आहे. जगमित्र साखर कारखान्यासाठी तुम्ही शेअर्सच्या रूपाने गोळा केलेले पैसे काय केले? तुम्ही देवस्थानच्या जमिनी खाल्ल्या असे.Dhananjay Munde



गुट्टे म्हणाले की, ‘तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली त्यांच्यासाठी किती ताकद लावली हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, की मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो. मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो. मी त्या पक्षांच्या स्टेजवर जाईन पण धनू भाऊ तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही.

पुढे बोलताना रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक दावा केला आहे की, ‘असं ते म्हणाले आहेत. आमदार गुट्टे यांच्या या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. धनु भाऊ हे जर खर असेल तर मग तुम्ही राजकारणातून संन्यास घेणार का तुम्ही आमदारकीचा राजीनामा देणार का? असा सवाल देखील यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केला आहे.

Dhananjay Munde would have been murdered in Indore but Bhayyuji Maharaj saved him, alleges MLA Ratnakar Gutte

महत्वाच्या बातम्या