विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होणार असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होणार आहे. बहुतांश माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे आले असले तरी त्यांना उमेदवारी देणे शक्य होणार नाही. Eknath Shinde
भाजपने शिवसेनेला 84 जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जरी 150 जागांवर एकमत झाले म्हणत असले तरी शिवसेनेच्या हक्काच्या 84 जागांचा प्रश्न कायम आहे. 2017 मध्ये 84 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. यातील बहुतांश माजी नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेला या जागांवर उमेदवारी न दिल्यास शिवसेना उमेदवारांमध्ये नाराजी पसरू शकते.
भाजप आणि शिवसेना यांच्या पहिल्या फेरीत दीडशे जागांवर सहमती झाली. यात 52 जागा शिवसेनेला देण्यात आल्या. मुंबई महापालिकेत 227 नगरसेवक आहेत आणि शिवसेनेची 125 जागांची मागणी आहे. शिवसेनेचे मागील निवडणुकीत 84 उमेदवार विजयी झाले होते. त्या जागा शिवसेनेला मिळाव्यात, असा एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. तर या जागा देण्यास भाजप तयार नाही, अशी माहिती मिळते. गुरुवारी (18 डिसेंबर) झालेल्या जागावाटपच्या दुसऱ्या बैठकीत यावरून गाडे अडल्याची माहिती मिळत आहे.
84 नगरसेवक असताना शिवसेना एक होती. ठाकरेंची ताकद होती. आता शिवसेनेत फूट पडल्यामुळे एकनाथ शिंदे यांची एवढी ताकद नाही, असे भाजपकडून उत्तर दिले जात आहे. त्याचवेळी तीन वर्षांत मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेला त्यांच्या मागील 84 जागा देण्यास नकार दिला जात आहे. दरम्यान, गुरुवारच्या बैठकीत शिवसेनेला 55 आणि भाजपला 102 जागा देण्यावर सहमती झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकूण 157 जागांवर भाजप-शिवसेनेची सहमती झाली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना पत्र लिहिले आहे. यात भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी द्या, अशी मागणी केली आहे. नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देताना कार्यकर्त्यांवर अन्याय होते. असे भाजपमध्ये होऊ नये, यासाठी पदाधिकार्यांनी पत्र लिहिले आहे. हा एकप्रकारे भाजपमधील घराणेशाहीला इशारा असल्याचे मानले जाते.
मुंबईवर महायुतीची सत्ता असली पाहिजे आणि त्यातही भाजपचे वर्चस्व हवे, यासाठी यासाठी भाजपने नव्या 20 जणांची समिती स्थापन केली आहे. मुंबईत एकूण 227 जागा असून 114 चे बहुमत आहे. या समितीत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, माजी अध्यक्ष आशिष शेलार, विनोद तावडे, प्रविण दरेकर, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, मंगल प्रभात लोढा, पियुष गोयल आदींचा समावेश आहे.
Eknath Shinde’s dilemma in the Mumbai Municipal Corporation elections
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole : महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा, नाना पटोले यांची पंतप्रधानांकडे मागणी
- Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळला
- माणिकराव काेकाटे यांना पाेलीसांनीच पळवले, प्रकाश आंबेडकर यांचा आराेप
- हे देशप्रेम नव्हे तर पाकिस्तान प्रेम, एकनाथ शिंदे यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर संताप