विशेष प्रतिनिधी
मुंबई: निवडणूक आयोग जे करत आहेत ते निवडणुकीचा पोरखेळ आहे. ब्राझील मॉडेलचा उल्लेख वारंवार केला जातो, मग त्याची अंमलबजावणी कधी केलीजाणार? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. Balasaheb Thorat
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर मतदार यादीवरून राज्य निवडणूक आयोगावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही. मतदार यादीतील अडचणी आधी दुरुस्त करायला हव्या होत्या, मात्र दुबार नावे काढण्याबाबत आधी अधिकार असल्याचे सांगणारा आयोग आता अचानक अधिकार नसल्याचे म्हणत आहे.
10 टक्के गोंधळ जरी असला तरी त्यामुळे किती मतदार वाढले असा सवाल उपस्थित करत डिजिटल युगात दुबार नावे स्पष्टपणे दिसत असतानाही त्यात बदल न होणे म्हणजे कुठल्यातरी रिमोट कंट्रोल खाली निवडणूक प्रक्रिया चालवली जात असल्याचा संशय थोरात यांनी व्यक्त केला. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल. मुंबईत 10, 111 मतदान केंद्र असतील, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या 27 महानगरपालिका तसेच नव्याने निर्माण झालेल्या जालना आणि इचलकरंजी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज घोषणा केली. निवडणूक रणधुमाळी 23 डिसेंबरपासून सुरू होणार असून 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.
Election Commission rigging the election, alleges Balasaheb Thorat
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप