EVM Worshipped : भोरमध्ये मतदान केंद्रातच चक्क ईव्हीएमची हळदी कुंकवाने पूजा!

विशेष प्रतिनिधी

भोर: EVM Worshipped  भोर नगरपरिषद निवडणुकीत एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावरच ईव्हीएम मशीनची हळद-कुंकवाने पूजा, नारळ, अक्षता आणि आरती करून मतदान प्रक्रिया सुरू केल्याचे उघड झाले आहे. EVM Worshipped



हा प्रकार मतदान सुरू असताना घडल्याचे समोर आले आहे. काही नागरिकांनी मतदान केंद्रातच पारंपरिक पूजा विधी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. EVM Worshipped

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, मतदान केंद्रावर कोणत्याही धार्मिक कृतींना कडक मनाई आहे. कोणत्याही धर्माचा प्रचार, धार्मिक विधी, प्रतीकं, मंत्र, आरती इत्यादी पूर्णतः प्रतिबंधित आहे. मतदान केंद्र परिसर ‘धर्मनिरपेक्ष क्षेत्र’ म्हणून घोषित

तरीसुद्धा भोरमधील या केंद्रावर मशीनवर तांब्या–पाण्याने शुचिर्भूत करणे, हळद–कुंकू लावणे आणि आरती करणे यासारखे विधी खुलेपणे पार पडले. या

स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की मतदान कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर ही पूजा झाली. कोणतीही कारवाई किंवा तत्काळ अडथळा आणला गेला नाही. अधिकारी उपस्थित असूनही नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मतदान केंद्राचा अहवाल उपविभागीय अधिकारी, निवडणूक विभाग आणि पोलिसांना पाठवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून या घटनेची सीसीटीव्ही पडताळणी होणार असून मतदान कर्मचाऱ्यांची चौकशी करून संबंधित नागरिकांची ओळख पटविणे ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

EVM Worshipped With Haldi-Kumkum Inside Bhore Polling Booth

महत्वाच्या बातम्या