विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chandrashekhar Bawankule शासकीय आणि शालेय कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.Chandrashekhar Bawankule
आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहावा लागणार आहे.साध्या अर्जावर तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहे. दहावी,बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांना प्रतिज्ञापत्र लागते त्यासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत.
जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह, शासकीय कार्यालयात देण्यात येणारे प्रतिज्ञापत्र यासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाच या दाखल्यांची गरज असल्याने त्यांना मोठा भुर्दंड बसत होता. सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून, आता विद्यार्थ्यांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
Exemption from stamp duty, stamp duty of Rs 500 to be added for affidavit waived off
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल