विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijay Vadettiwar राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दोन मंत्री पद रिक्त होण्याची शक्यता असल्याने त्यावर डोळा ठेवून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार अजित पवार गटात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.Vijay Vadettiwar
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याने नाराज विजय वडेट्टीवार नाराज आहेत. त्यामुळे ते महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विधानपरिषदेच्या उमेदवारीसह कॅबिनेट मंत्रिपदाची अट विजय वडेट्टीवार यांनी घातली आहे. भारतीय जनता पक्षाकडून या मागण्या मान्य होणार असल्याची खात्री असल्याने विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाण्याची तयारी सुरू केली आहे. विदर्भात अस्तित्व नसलेल्या अजित पवार गटाला विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने एक नेता मिळू शक्ती विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. पुन्हा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून यावे लागेल. त्याऐवजी त्यांनी विधानपरिषदेच्या वाटेने विधिमंडळात जाण्याचे ठरवले असल्याचं बोलले जात आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी याच महिन्यात पोटनिवडणूक होत आहे. तेव्हा विधानपरिषद व मंत्रिपद द्या, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केल्याचे समोर येत आहे.
दुसऱ्या बाजूला विजय वडेट्टीवार यांच्याब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव अशोक भैय्याजी, नगरपरिषद माजी गटनेते विलास विखार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. सतीश कावळे, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव लांजेवार, सुरेश दर्वे यांसह अनेकांनी मंगळवारी मुंबईत भाजपात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात खिंडार पडले आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनीही दुसरा पर्याय स्वीकारण्याची तयारी सुरू केली आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवार आहे. अशावेळी दोन पैकी एक मंत्रिपदाची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे .
राष्ट्रवादीत जाण्याची इच्छा नसलेल्या विजय वडेट्टीवारांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विजय वडेट्टीवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत 11 ते 15 मार्च या दरम्यान घडामोडी घडणार असल्याची दाट शक्यता आहे. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात गेली 50 वर्षे काँग्रेससोबत असलेल्या खंद्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
या कार्यकर्त्यांसमोर विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असे आता सूत्रांकडून समोर आले आहे. विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानपरिषदेची उमेदवारी आणि मंत्रिपद मागितले असल्याची माहिती मिळत आहे.
Eyes on Ministership, Vijay Vadettiwar preparing to join Ajit Pawar group
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल