विशेष प्रतिनिधी
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता मोठी कारवाई होत असून रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिकचा भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर त्याच्यासोबतचे छत्री धरलेला फोटोही समोर आला होता. त्यानंतर चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा दोन दिवसात राजीनामा घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सीएमओ कार्यालयाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर चाकणकरांवर टीकेचा भडीमार झाला होता. विविध स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा येत्या दोन दिवसात राजीनामा घेण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सीएमओ कार्यालयाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अगोदरच आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे सखोल तपास करण्यात आले आहे. तर चाकणकर यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.
भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये तेजस्विनी सातपुतें यांच्या अध्यक्षतेखाली SIT अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरातची झाडाझडती सुरू असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आता याप्रकरणात सरकार कुणा कुणाला अटक करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“First Casualty in Kharat Scandal? CM Orders Rupali Chakankar to Step Down”
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास
