विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा. आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका. शिंदे समितीला मुदतवाढ दिली. मात्र, समिती काम करत नाही. समाजाला फसवू नका, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. Devendra fadnavis
पत्रकारांशी बोलताना जरंगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. मराठ्यांच्या आमदारांना सांगतो तुम्हाला समाजाने मत दिली आहे. आरक्षणाचा विषय लावून धरा, मराठ्यांच्या मताचा आदर राखा. प्रश्न मांडला नाही तर गाव गावात परिणाम दिसतील. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक दुर्बल घाटांसाठीची सवलत ( SCBC) ही इतर मागासवर्गीय योजनेच्या ( OBC) धर्तीवर लागू करा. मुलींचे मोफत शिक्षण सुरु करा.
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका करताना जरांगे म्हणाले, भुजबळ जन्मल्यापासून मराठा आरक्षणासाठी आडवा येतो. सगळ्या जातीच आरक्षण घेतो. कोणत्याही प्रकरणाला जातीचा रंग देतो. महान व्यक्ती (भुजबळ) संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी नाही बोलला, मात्र जातीवाद करतो. येवल्याच्या नेत्याला जातीच विष कालवायच आहे. कोणतेही कागद घेऊन इवळतो. भुजबळ जातीय विष पेरून अजित पवार सरकारला अडचणीत आणतो. तुझ वय काय झालं? बोलतो काय? चुकलं त्याला सजा झाली पाहिजे. परळीत आमच्या जातीच्या माणसाला दुसऱ्या जातीच्या लोकांनी मारहाण केली. आम्ही जातीच वळण दिलं नाही. तुम्ही आमचे काढा आम्ही तुमचे व्हिडिओ काढणार आहे.
प्रशांत कोरटकर याना अद्याप अटक होत नसल्याबद्दल जरांगे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मी अगोदर सांगितलं सग्या सोयाऱ्यांवर कारवाई होत नाही. महापुरुषांवर वाईट बोललं तर कारवाई होत नाही. सोलापूरकर, कोरटकर यांच्यावर कारवाई होत नाही. महाराजांचा अवमान केला गेलेल्यांना सगळ्यांना धडा शिकवणार आहे. महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांना मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. सरकारने हा कायदा नव्याने अधिवेशनात पारित करावा.
Fulfill your word, don’t force people to protest, Manoj Jarange warns the Chief Minister Devendra fadnavis
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल




















