गोकुळची निवडणूक अजून लांबणार; पण नेमकं कारण काय?

विशेष प्रतिनिधी

पुणे: कोल्हापूर जिल्ह्यात वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.येत्या ९० दिवसात निवडणूक घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.मात्र ह्याबाबत निवडणुकीचा प्रकिया कालावधी वाढवून घेण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे समजत आहे.

पुढील ९० दिवसात निवडणूक घेण्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी लागणार आहे.न्यायालयाकडून याबाबत पूर्ण स्पष्टीकरण मिळाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरण गोकुळ निवडणुकीची पुढची प्रक्रिया पार पडणार आहे.



कोल्हापूर सर्किटबेंच चा आदेश काय?

गोकुळ दूध संघातील निघालेल्या १३२० दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया येत्या ८० दिवसात पूर्ण करून पात्र आणि अपात्र यावर निर्णय घेऊनच गोकुळ दूध संघाची निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंच कडून देण्यात आले होते.मात्र या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि जनसुराज्य शक्तीच्या काही दूध संस्थांनी आव्हान दिले होते,या आव्हानानंतर सुप्रीम कोर्टाने गोकुळच्या निवडणुका ९० दिवसात घेण्याचे आदेश दिले होते.

मात्र या निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाल्यामुळे विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडून सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे, तर प्राधिकरणाकडून राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. त्यामुळे निर्णय बाबत अधिक स्पष्टीकरण घेण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणार असल्याचे सांगितले जात आहे.

Gokul’s election will be delayed; but what is the real reason?

महत्वाच्या बातम्या