विशेष प्रतिनिधी
सोलापूर(अक्कलकोट): श्री स्वामी समर्थांची कर्मभूमी असलेल्या अक्कलकोट नगरीत नगरपरिषदेने भाविकांच्या श्रद्धेचा मान राखत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. अक्कलकोट शहरात आता प्रत्येक गुरुवारी मांस विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आणि नगरपरिषदेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून, विशेषतः स्वामी भक्तांकडून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. Akkalkot Municipal Council
भाविकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश
अक्कलकोट हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दर गुरुवारी येथे स्वामींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. ‘गुरुवार’ हा स्वामींचा वार मानला जात असल्याने, या दिवशी शहरात मांस विक्री बंद असावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक रहिवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर नगरपरिषदेने या जनभावनेची दखल घेत हा ऐतिहासिक ठराव मंजूर केला आहे.
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
मावाबंदीनंतर आता मांसविक्रीवर निर्बंध
काही काळापूर्वीच अक्कलकोटमध्ये ‘मावाबंदी’चा धाडसी निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाने शहराचे पावित्र्य राखण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे.
निर्णयाची ठळक वैशिष्ट्ये:
अंमलबजावणी: प्रत्येक गुरुवारी शहरातील सर्व मटण, चिकन आणि मासे विक्रीची दुकाने बंद राहतील.
उद्देश: स्वामी भक्तांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे आणि तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपणे.
प्रतिसाद: या निर्णयामुळे अक्कलकोटमधील वातावरण भक्तीमय झाले असून सोशल मीडियावरूनही या निर्णयाचे कौतुक होत आहे.
नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रशासनाच्या या भूमिकेमुळे अक्कलकोटच्या धार्मिक पर्यटनाला आणि शिस्तीला अधिक बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
Historic Decision by Akkalkot Municipal Council: Meat Sale to be Completely Banned Every Thursday
महत्वाच्या बातम्या