विशेष प्रतिनिधी
नाशिक: अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, आता त्याच्या समर्थनासाठी सामाजिक क्षेत्रातील मोठी व्यक्तिमत्त्वे पुढे येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. Popatrao Pawar
हिवरे बाजारचे सरपंच आणि पद्मश्री पोपटराव पवार यांचा खरातसोबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून, खरातच्या ‘ओशनोलॉजी’ या तथाकथित शास्त्राला वैज्ञानिक आधार असल्याचे प्रमाणपत्रच पवारांनी दिले आहे. खरात सध्या गजाआड असताना त्याचे कुटुंबीय हिवरे बाजारात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे.
पोपटराव पवार आणि अशोक खरात यांचे संबंध २०११ पासूनचे आहेत. हिवरे बाजार येथील मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने खरात तेथे तीन दिवस मुक्कामास होता. “गावात पाणी येण्यासाठी खरात यांनी काही उपाय सांगितले होते. गावच्या देवीची पूजा केल्यानंतर मोठा फरक पडला,” असे खळबळजनक वक्तव्य पवारांनी या व्हिडिओमध्ये केले आहे. खरातच्या ‘ओशनोलॉजी’चा वापर युरोपमधील पोलीस तपासासाठी करतात, असा अजब दावाही त्यांनी यावेळी केला.
अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर नाशिकमध्ये त्याच्याविरुद्ध संतापाची लाट आहे. अशा परिस्थितीत खरातचे कुटुंबीय सध्या हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्या आश्रयाला असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ आश्रयच नव्हे, तर खरातला लागणारी कायदेशीर मदत आणि आर्थिक रसद देखील पोपटराव पवार पुरवणार असल्याचे बोलले जात आहे.
आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच म्हणून देशभरात ओळख असलेल्या पोपटराव पवारांसारखी व्यक्ती एका भोंदू बाबाच्या चमत्कारांचे समर्थन कशी करू शकते? असा सवाल आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
Hivre Bazar Sarpanch Popatrao Pawar Backs Ashok Kharat, Offers Shelter to Family
महत्वाच्या बातम्या
- स्किल इंडिया’मध्ये महाराष्ट्राची आघाडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Tirupati : देशाच्या टॉप-10 मंदिरांजवळ ₹9 लाख कोटींची संपत्ती; तिरुपती बालाजी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळ
- ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा
- पुणे मेट्रो आता कात्रज घाट ओलांडून आता थेट शिवापूरला धावणार ?