स्किल इंडिया’मध्ये महाराष्ट्राची आघाडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केवळ तरुण लोकसंख्या असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश (डेमोग्राफिक डिविडंड) हा तयार होतो. तरुणांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे (उदा. एआय, मॅन्युफॅक्चरिंग) प्रशिक्षण देणे आवश्यक असते. हीच बाब ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्किल इंडिया’ची चळवळ सुरू केली आणि महाराष्ट्राने त्यात आघाडी घेतली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. Devendra Fadnavis

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी भांडवल महत्त्वाचे होते, पण आता गुंतवणूकदार तिथेच जातात जिथे कुशल ‘मानव संसाधन’ उपलब्ध आहे.कृत्रिम बुध्दीमत्ता हे आव्हान पेलण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. काळानुरूप मानव संसाधन तयार करावे लागेल. उद्योगांच्या गरजेनुसार दिवसागणिक कौशल्य प्रशिक्षणात बदल करावे लागतील. आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ ‘एआय लिविंग लॅब’ सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. Devendra Fadnavis



विद्यापीठाने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने 10,000 महिलांना एआय ट्रेनिंग दिले आहे. “जॉब मार्केट वेगाने बदलत आहे. पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत कौशल्य विद्यापीठांना अधिक लवचिक राहावे लागेल. आज भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाकडे झेप घेत असताना, या गतीला टिकवून ठेवण्यासाठी केवळ पदवीधर नव्हे, तर ‘कौशल्य प्रशिक्षित’ तरुणांची गरज आहे.”देशात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा 31 टक्के आहे. महाराष्ट्र जर स्वतंत्र देश असता, तर ती जगातील 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती. दावोस परिषदेत नुकतेच 30 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र युएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र स्टार्ट अप्स आणि युनिकॉर्न मध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचा हा दीक्षांत सोहळा ऐतिहासिक आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भावी आयुष्याच्या स्वप्नांचा आज सन्मान होत आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. त्याअनुषंगाने केंद्रासोबतच राज्य सरकार ही कार्यरत आहे. मला सांगायला आनंद वाटतोय औंध येथील आयटीआय अतिशय अत्याधुनिक आणि रोजगाराभिमुख करण्यात आले आहे. कौशल्य विभागाच्या दक्ष आणि नुकतेच आकाराला आलेले महिमा योजनांमुळे राज्यभरात कौशल्य विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून नवदिशा केंद्र राज्यातील ३६ ठिकाणी उभारण्यात येत कौशल्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचे काम सुरू आहे. प्राचीन काळी भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जायचे, त्यामागे केवळ कृषी नव्हे तर प्रत्येक घरातील कौशल्य ही मोठी ताकद होती. प्रत्येक कुटुंबातून सूक्ष्म उद्योग उभे राहत होते. हीच परंपरा पुन्हा जोपासण्याची गरज आहे.महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासन मजबूत असून, आता कौशल्य क्षेत्रात आणखी प्रगती करण्यावर भर दिला जात आहे, असे ते म्हणाले.

Maharashtra Leads in Skill India, Says CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या