माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता प्रमुख देवजीचे केंद्रीय समिती सदस्य ‘संग्राम’ आणि 16 नक्षलवाद्यांसह आत्मसमर्पण

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : नक्षलवादी चळवळीचा ‘मास्टरमाईंड’ माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता प्रमुख देवजी उर्फ तीपिरी तिरुपती ने 16 माओवाद्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. देवजीसह त्याचा खंदा समर्थक आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी ऊर्फ ‘संग्राम’ हा देखील त्याच्यासोबत पोलिसांना शरण आला. या दोघांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेचा कणाच मोडला आहे.

नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याच्या खात्म्यानंतर मे 2025 पासून देवजी नक्षल संघटनेचा महासचिव म्हणून काम करत होता. छत्तीसगडमधील ७६ जवानांच्या बलिदानाला कारणीभूत ठरलेल्या दंतेवाडा हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. देवजी याच्यावर १.५ कोटींचे बक्षीस होते. तर १९७५ पासून चळवळीत सक्रिय असलेला संग्राम ओडिशा राज्याचा सचिव होता. संग्रामवर १ कोटींचे बक्षीस होते.

देवजी हा तेलंगणातील जगतियाल जिल्ह्याचा रहिवासी आहे. ६४ वर्षीय देवजीने १९८३ मध्ये पीपल्स वॉर ग्रुपमधून प्रवासाला सुरुवात केली होती. गडचिरोलीत दलम कमांडर म्हणून काम केलेल्या देवजीने गोव्यापासून केरळपर्यंत नक्षलवादाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘अवामी जंग’ या नियतकालिकाद्वारे तो नक्षली विचारसरणीचा प्रसार करायचा.

मल्लाराजी रेड्डी (संग्राम) हा तेलंगणातील पेदापल्ली जिल्ह्यातील शतरंजपल्ली येथील मूळ रहिवासी होता. मल्लाराजी १९७५ पासून माओवादी चळवळीत सक्रिय होता. २०२३ पर्यंत तो ओरिसा स्टेट कमिटीचा सचिव म्हणून काम पाहत होता. त्यानंतर नक्षल्यांचा गड असलेल्या बस्तर भागात त्याने काम सुरू केले होते. त्याची पहिली पत्नी रथनम्मा १९९८ मध्ये चकमकीत ठार झाली होती, त्यानंतर त्याने छत्तीसगडमधील सगुणा हिच्याशी विवाह केला होता.

Major Blow to Maoists as Top Leaders Devaji, Sangram, 16 Cadres Surrender

महत्वाच्या बातम्या