विशेष प्रतिनिधी
लातूर : Insurance Money एक कोटी रुपयांच्या विमा रकमेचा लोभ मनुष्याला किती थराला नेऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण लातूरमध्ये उघडकीस आले आहे. ५७ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःचा मृत्यू खोटा भासवण्यासाठी एका निरपराध माणसाचा खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी गणेश चव्हाण याला अटक केली आहे.Insurance Money
शनिवारी उशिरा औसा तालुक्यात जळत असलेली कार आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर गाडीच्या आत एक जळालेलं शव मिळालं. गाडी आणि आत सापडलेला ब्रेसलेट पाहता हे शव गणेश चव्हाण यांचेच असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज वर्तवण्यात आला. चव्हाण यांच्या पत्नीनेही पती रात्री दहा वाजता घरातून लॅपटॉप देण्यासाठी बाहेर पडल्याचे, परंतु परत न आल्याचे सांगितले.Insurance Money
मात्र, संशय आल्याने पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला आणि या घटनेला धक्कादायक वळण मिळाले. चौकशीत कळले की गणेश चव्हाण जिवंत असून सिंधुदुर्गमध्ये लपून बसला आहे.Insurance Money
पोलिसांनी तपासात उघड केले की, चव्हाणने मद्यधुंद अवस्थेत लिफ्ट मागणाऱ्या गोविंद किशन यादव (वय ५०) याला गाडीतून घेतले. त्यानंतर त्याची हत्या करून त्याचे शव गाडीत टाकून गाडीला आग लावली आणि स्वतःचा मृत्यू खोटा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
चव्हाणने घेतलेल्या विम्याची रक्कम होती तब्बल १ कोटी रुपये, तर त्याच्यावर ५७ लाखांचे कर्ज होते. हे कर्ज मिटवण्यासाठी त्याने हा राक्षसी डाव आखला.
लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, “घडलेल्या घटनेवरून सुरुवातीला चव्हाणचा मृत्यू झाल्याचे मानले गेले, परंतु तपासात तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला बेपत्ता व्यक्ती म्हणून दाखवून तपास पुढे नेल्यावर सत्य बाहेर आले.”सध्या पोलिसांनी चव्हाणला ताब्यात घेतले असून या हत्येचा तपास सुरू आहे.
Man Slaughters Innocent Victim to Fake Death for ₹1 Crore Insurance Money
महत्वाच्या बातम्या
- मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा इतर भागाशी जोडणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Aditya Thackeray : भारतीय बिल्डर पार्टी, फेकनाथ मिंधे, पागडीमुक्त मुंबईवर आदित्य ठाकरेंचा निशाणा
- Ajit Pawar : शिष्यवृत्ती नाही कृपा, दान किंवा भीक तर घटनात्मक अधिकार, रामदास आठवले यांनी अजित पवारांना सुनावले
- बिगुल जिल्हा परिषद की महानगरपालिकांचे? राज्य निवडणूक आयाेगाची आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद