विशेष प्रतिनिधी
बीड : एका अर्धनग्न अवस्थेतील व्यक्तीला एक व्यक्ती बॅटने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मारहाण करणारा हा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश भोसले आहे. या खोक्या उर्फ भोसलेला धस यांचा आशीर्वाद आहे. MLA Suresh Dhas
सतीश भोसले आणि सुरेश धस यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. धस यांना बॉस, तुमचा आशीर्वाद राहू द्या असे हा भोसले म्हणत आहे.
सतीश भोसले आणि आमदार धस यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये सुरेश धस म्हणतात, हा खोक्या… हॅलो, सॉरी अरे बाबा मला गडबडीत जमलं नाही शुभेच्छा द्यायला. वाढदिवसाच्या बीलेटेड शुभेच्छा. सुरेश धसांच्या शुभेच्छांना खोक्या उर्फ सतीश भोसले हा धन्यवाद.. तुमचा आशीर्वाद राहू ध्या फक्त असा प्रतिसाद देतो. तेव्हा आमदार सुरेश धस हे शंभर टक्के आहे… 99 टक्के सुद्धा नाही, शंभर टक्के आहे. ओके बॉस.. धन्यवाद बॉस.. असे हे संभाषण आहे.
सतीश भोसले हा मारहाण करत असलेला व्हिडिओ दीड वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे, तर आमदार सुरेश धस यांनी खोक्या उर्फ सतीश भोसले माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई करावी असे म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आणला आहे. यामध्ये चालत्या कारमध्ये कारचालकाच्या बाजूला बसून खोक्या उर्फ सतीश भोसले नोटांचे बंडल मोजत आहे.
सतीश भोसलेने मारहाण केलेला पीडित तरुणही समोर आला आहे. त्याने म्हटले आहे की, सतीश भोसलेच नाही तर त्याच्या कुटुंबियांनीही मारहाण केली. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. वाल्मीक कराड याला आका तर धनंजय मुंडे यांना आकाचा आका म्हटले होते. ते आमदार सुरेश धस आता बॉस म्हणून या प्रकरणात अडचणीत आले आहेत.
MLA Suresh Dhas blesses Satish Bhosale who beat him up!
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबो